कारकूनपंत,

आजचे पान खूप विचार करावयास लावणारे आहे.

दारिद्र्याचे यापेक्षा दुसरे रूप कोणते? हीच गरीबी. डिस्कवरी, सीएनएन, बीबीसी सगळ्या चॅनेलच्या पत्रकारांनी अगदी भरभरून 'दारिद्र्यरेषेखालचा भारत' या मथळ्याखाली नोंद घ्यावी असेच ते दृष्य होते.

दारिद्र्य करुण आहेच पण परदेशी वाहिन्यांच्या वृत्तीवर नकळत प्रकाश पाडणारे हे वाक्य मनाला भिडले.

वरती इतर मनोगतींनी व्यक्त केलेल्या बहुतांश मतांशी आम्ही सहमत आहोत.

दुःखाने माणूस सावरतो आणि निःश्रेय सेवेकडे वळतो हा सात्त्विक विचार मनाला सुखावून गेला.

आपला
(चिंतनशील) प्रवासी