वृकोदर महाशय,

आपण फार चांगले मुद्दे मांडले आहेत. विशेषतः मराठीचे मराठीपण नाहीसे करणारे हिंदी शब्द टाळायलाच हवेत.

दीपक हे नाम असेल तर त्याचा अर्थ दिवा असा होतो. दीपक हे विशेषण असेल तर त्याचा अर्थ दिपवणारे असा होतो. त्यामुळे नेत्रदीपक हा शब्द योग्य आहे असे वाटते.

अजून एक शब्द म्हणजे

'अजून' हा कालदर्शक शब्द आहे. उदा० अजून आला नाही. अजून आठवते. इत्यादी. येथे राशिदर्शक अर्थाने 'आणखी' हा शब्द वापरावा असे वाटते.

आपला
(शब्दविशिष्ट) प्रवासी