प्रभाकर,
दुसऱ्या भागाने काहीसे अपेक्षित वळण घेतले असले तरी आपल्या निरीक्षणशक्तीची आणि ते सहजपणे कागदावर आणण्याची पद्धत आहे कौशल्यपूर्ण आहे. प्रतिसादात काहींनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत त्याशिवाय ज्याची नोंद घेतली तेवढेच सांगतो.
गणेशोत्सवासारख्या कार्यक्रमाद्वारे तुम्ही सार्वजनिक क्षेत्र, राजकारण आणि कोणतेही संघटित कार्य यात चाललेल्या गैरप्रकारांवर ताशेरे ओढले आहेत.
जुन्या जमान्यातील अजरामर गाण्यापेक्षा आजचे रिमिक्सचे बदलते वातावरण, त्याचा तरुण पिढीवर असलेला प्रभाव, ख्यातनाम कलाकारांचे वागणे .अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी विनोदाच्या फोडणीने चविष्ट केल्या आहेत. त्यातले संदेशाचे गंभीरपण तसूभरही कमी झाले नाही हे आपल्या शैलीचे कौशल्य.
सुंदर मनाची पकड घेणारे लेखन, मनाला प्रसन्न करणारा विनोदाचा शिडकावा. शेवटी हा प्रश्न मनात आहे की शर्वरी परत कशी आली?