प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. पण प्रत्येकाला  आपल्या विचारांचे नियम असावेत असं वाटायला लागल्याने
गोंधळ उडतो. अभिमान धरा म्हणून एखाद्या गोष्टीचा अभिमान धरला जात नाही. तसेच तुमच्यात धाडस असायला हवं
असं म्हंटल्याने धाडस येत नाही. असो. बेफिकिर यांचे विचार पटले. ते व्यावहारिक आहेत. आणखीन एक नवीन वृत्ती
म्हणजे, जर एखाद्याने नवीन काही केले आणि तो मराठी असला तर त्याचा लगेच अभिमान धरला जातो, आपला सहभाग त्यात 
किती , हे पाहिलं जात नाही, याचही आश्चर्य वाटतं.