शतकानुशतके भाविक भक्तांच्या अडी अडचणीच्या वेळी धावून
येणारे कुलदैवत म्हणून जेजुरीच्या खंडोबाकडे अनेकांनी, अगदी राजापासून
रंकापर्यंत सर्वांनी साकडे घातले आणि आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर
प्रत्येकाने आपल्या इच्छा शक्तीप्रमाणे जेजुरगडाचे वैभव वाढविण्यामध्ये
हातभार लावला. उंचच्या उंच दीपमाळा भव्य दिव्य कमानी आणि लांब-रुंद पायऱ्या
हे सर्व पाहिल्यानंतर कोणा एका लोकगीतकाराने त्याच्या डोळ्यासमोर दिसलेल्या
जेजुरीचे वर्णन आपल्या शब्दात मांडले........
देवा तुझी सोन्याची जेजुरी
गडाला नवलाख पायरी
जिथे नांदतो मल्हारी ..