लेख नेहमीप्रमाणे थंडीच्या दिवसांत रविवारी सकाळच्या उन्हात बसून दुसरा चहा पितापिता गप्पा माराव्या, गावाकडच्या जुन्या आठवणी काढाव्या तसा खेळकर. फार आवडला. लेखातले काही संदर्भ मनाला गुदगुल्या करून गेले.
आत्मविश्वास ’पक्व फळापरी गळला हो
मीपण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो
जीवन त्यांना कळले हो
किंवा
’भीडके बीच’ छान ’अकेलापन’
छोटा सफर हो, लंबा सफर हो, सूनी डगर हो या मेला
याद तू आये, मन हो जाये, भीड के बीच अकेला

पतिराज, गुरुत्वमध्य, सप्ताहान्त हे शब्द वाचून फार बरे वाटले.'यातायात' या शब्दावरची परिचित कोटीही तशीच आवडली. 'फंडा' हा शब्द बाकी बोचला. 'वीकांत, धन्यु' अशा धेडगुजरी शब्दांच्या जमान्यात असले शब्द 'ब्रेथ ऑफ फ्रेश एअर' सारखे वाटतात. धन्यवाद, मीराताई.