जर कोणी नवीन काही करत असेल तर त्याला प्रोत्साहन द्यावे कमीत कमी पायात पाय अडकवू नये. कोणाला काय आवडावे ,कोणी कशाचा प्रसार करावा हे ज्याचे त्याला ठरवू दयांना . जिथे आज मुंबई/पुण्यात लोकांना सार्वजनिक ठिकाणी मराठी बोलणे सुद्धा दुरापास्त झाले असताना कुठे डिस्क मध्ये , डिजे वर निदान कोंबडीच्या निमित्ताने एखादे मराठी गाणे लागते तर त्यात अडचण काय आहे . जर मराठीत शंभर अल्बम तयार झाले त्याला मागणी आली , चांगला खप झाला तर पुढल्या वर्षी नक्कीच ५/१० दर्जेदार अल्बम बघायला मिळतील . (१० कोटी च्या महाराष्ट्रात लाखाचा खप काही मोठी गोष्ट नाही ) . आजही छान गाणी आहेत.
त्यामुळे योगेश तुमच्या एकंदर प्रकल्पाला शुभेच्छा !!