प्रिय संजय,

तूमची लेखमाला २ दिवसांपूर्वी गवसली आणी वेड लागल्यागत वाचून काढली.

आपण एखाद्या जंगलात (हा संसार हेच जंगल) बाहेर पडायचा रस्ता शोधत असताना दमून सर्व आशा सोडून द्यावी आणि अचानक कोणीतरी भेटावे जो म्हणेल की हात्तीच्या, अरे मी आत्ताच तर बाहेर जाउन आलो, ईट'स सो इझी ! मी तर दिवसातून अनेकदा बाहेर जाऊन येतो, ईन फ्याक्ट , मी आताशा बाहेरच राहतो,कधीही आतबाहेर करतो .. तूलाही बाहेर जायचं असेल तर ह्या झाडावर थोडंस उंचावरून बघ, वाट दिसेल..

आणि खरेच तसे झाडावर चढून पाहिल्यानंतर लक्षात यावे की , जंगलाबाहेर असे काहीच नाही , सर्वत्व जंगलच आहे ,म्हणजेच आपण निरर्थक बाहेर जाण्याची वाट शोधत होतो..आणि आपले आपल्यालाच खुदकन हंसू यावे !

आणि हे लक्षात आल्यानंतर, शोधासाठी होणारी धावपळ थांबावी आणि शांतपणे जंगलातच रमावे. शोध  संपल्याने आता पक्षांची मंजूळ गाणी ऐकू यावीत, निसर्गसंगीत ऐकू यावे  ई ई ..

खरेच होईल का असे ? कितीजण असे भाग्यवान असतील? मी ही त्यात सामील होऊ शकेल का?

यू आर लकी .. मीही ओशोंना अनेकदा वाचलंय...पण मला वाटते जाणीव होणे आपल्या हातात नसावे.

आपण वाचत असलेल्या माहीतीचे (हो दूसयांचा अनुभव माहीतीच, ज्ञान नव्हे) संकलन होत जावे आणि एखाद्या वेळी,एखाद्या प्रसंगाने, एका क्षणी ,अचानक सगळ्या माहीतीची संगती लागावी आणि ज्ञानोदय व्हावा , सर्व गोष्टी सूर्यप्रकाशाऐवढ्या स्पष्ट व्हाव्यात , असेच होत असावे..

एकदा संगती लागल्यानंतर,ज्ञानोदय झाल्यानंतर,ओशो काय तुकाराम काय अन बुद्ध काय सर्व तेच सांगायचे हे लक्षात येत असावे...

कळस