'आपणच सत्य आहोत' हे तुम्ही माझ्या कडून लिहून घ्या! (म्हणजे आता लिहूनंच दिलंय).
जी काही सत्याची विशेषणं आहेत : निराकार, अमृत, अकाल, मुक्त, स्वच्छंद वगैरे ती आपल्यालाच लागू आहेत या बोधानी जगा, तुम्हाला सॉलिड मजा येईल.
लोक जरी 'तुम्ही भ्रमात आहात' म्हणले तरी तुमच्या भ्रमाचा आधार सत्य असेल कारण ते आपल्याला काहीही न करता, काहीही करण्या पूर्वी लाभलेलं आपलं स्वरूप आहे. आपण कितीही प्रयत्न केला तरी सत्या पासून वेगळे होऊ शकत नाही कारण सत्य आणि आपण दोन नाही!
संजय