तुमचे लेखन आवडते. म्हणूनच वाट पाहावी लागली तरी काही वाटत नाही, उलट उत्सुकता आणखी ताणली जाते. त्यानिमित्ताने सगळे भाग पुन्हा वाचले जातात. तुम्ही लिहिलेल्या कथा छान असतात. मला, भावाला आणि माझ्या आईला आवडतात. पण तिला मनोगतवरून वाचता येत नाहीत. आम्ही तिला कामापुरता संगणक शिकवला आहे. त्यामुळे तिला पाठवलेले विपत्र वाचता येते. आम्ही तिला तुमच्या कथा विपत्राने पाठवतो. "गोष्ट जुनीच... माणसं नवीन" या कथेच्या पुढच्या भागासाठी ती रोज विचारायची. कालच तिला हा भाग पाठवला.