शेवटचे चार पर्याय उघडले गेले नाहीत. त्यामुळे वाचता आले नाहीत. असो! बाकीचे जे वाचले त्यांच्याशी  मी अगदी सहमत आहे. आपण मराठी माणसांनीच मराठी बद्दल आग्रह धरला पाहिजे. मराठी वापरत राहिले पाहिजे. माझी स्वतःची बँकेच्या खात्यावर सही मराठीत आहे. माझे आणि माझ्या यजमानांचे एकच खाते आहे. त्यांची सही इंग्रजीत आणि माझी मराठीत आहे. आता प्रॉब्लेम असा झाला आहे की आजकाल त्यांची सही जुळत नाही. त्यामुळे माझ्या सहीने काम चालवावे लागते. मी बाहेर भाजी आणायला जाते तेव्हा भाजीवाल्याशी किंवा भाजीवालीशी मराठीत बोलते यात नवल नाही. कारण ते मराठीच असतात. पण जेव्हा फळवाल्या भय्याशी बोलायची वेळ येते तेव्हाही मी मराठीतच बोलते. भले तो बोलला नाही मराठी तरी त्याला मराठी कळते नक्की. (मी नागपूर मध्ये  रहाते ) इथे तसेही जास्त हिंदीच चालते. पण मी आवर्जून मराठीच बोलते. माझे कुठेही अडत नाही. 'मराठी दिन' साजरा करताना 'मराठी (माणूस) दीन' व्हायला नकोच.