वेदश्री,
मला राग वगैरे नाही आला.
...आणि मला हा भाग आवडलाय हो तसा पण तरीही नाही आवडला कारण गणेशोत्सवात तरुणाई काय करू शकते, काय करते याचं छान चित्र मला माहितेय. असा झंकीपंकी डीजे वगैरे बोलवलेला मी तरी कधी पाहिलेला नाही.जे प्रत्यक्षात कधी पाहिलं नाही, ऐकलंसुद्धा नाही ते पचवायला सोपं कसं जाईल मला? म्हणून नाही पटलं..
पण वेदश्री, हे 'अनुभवकथन' नाहीए. हे 'ललित-लेखन' आहे. ह्यातील कल्पनाविलासाची मजा लुटायची.
तरूणाई आणि प्रौढाई असे दोन तट कथेच्या सोयीसाठी केलेले आहेत. गणेशोत्सव जितका नेटका, सुसंस्कृत करता येतो तितकाच विस्कळीत, असंस्कृतही होऊ शकतो.
असो.
पुढचा भाग उद्या.