सत्य समजणं आहे!
१) तुम्ही शांतपणे सभोवताली पाहा, निराकार सर्व व्यापून आहे; व्यक्तीला राग आला म्हणून त्याचं स्वरूप बदलत नाही, स्थिती बदलत नाही. स्थिती नेहमी घटनेनं अनाबाधीत आहे, म्हणून तर सत्याला ‘नित्य’ म्हटलंय!
राग आला तर त्या दरम्यान स्वरूपाचं विस्मरण होईल पण स्वरूप कसं बदलेल?
२) >सत्याचा बोध तुम्ही सांगता त्याप्रमाणे सोप्पा जरी असला तरी तुमच्या प्रत्यक्ष माहितीत किती जणांना हा झाला आहे?
= कळस, सत्याचा बोध होणं आणि तसा उदघोष करणं हे सर्वात मोठं साहस आहे त्यामुळे इथे स्वरूपानी जरी प्रत्येक जण सत्य असला तरी तसा उदघोष तो करत नाही, तुम्ही तसा उदघोष करावा म्हणून तर मी लिहितो.
तुम्ही जर मला विशेष मानलंत तर तुम्ही त्या बोधा पासून वंचित रहाल कारण मग तुमची नजर स्वत:कडे वळण्या ऐवजी सदैव दुसऱ्याकडेच राहील.
खरं तर तुम्ही अशा चित्तदशेत स्वत:ला विषेश कराल कारण सत्य ही मूळ स्थिती आहे आणि व्यक्ती ही स्पेशॅलिटी आहे!
३) > ते उमजण्यासाठी "तो" क्षणच यावा लागतो जो आपल्या हातात नाही.
= तो क्षण सदैव आत्ता आहे! कारण सत्य, ती स्थिती आत्ता आहे आणि तुम्ही घटनेची वाट पाहतायं!
संजय