मी कोण?
मी एक थेंब,
जीवनाच्या पावसाबरोबर येणारा,
आयुष्याच्या पानावर विसावणारा,
काही क्षण विसावून ओघळून जाणारा,
दुसऱ्या थेंबाशी एकरूप होणारा,
कोवळ्या उन्हात मोत्यासारखा चमचमणारा,
क्षणभराच्या अस्तित्वानेही दुसऱ्याना आनंद देणारा,
अन जाता जाता अनेक क्षणांची आठवन ठेवून जाणारा.