मी गेल्या एक वर्षात मी नागपूर-दुर्ग-दल्ली राजहरा असा सारखा प्रवास करतेय. दुर्गला स्टेशनला उतरायच समोरच्या हॉटेलात/खानावळीत जेवायचं दुसरी ट्रेन पकडून दल्ली जायचं असा महिन्यातून दोनदा प्रवास होतो. एकदा ह्या हॉटेलात एक नवीन पाटी लावलेली दिसली. झूठा डालनेपर जूर्माना पडेगा. हॉटेल मालकाला विचारले की ह्या पाटीमुळे काही फरक पडला का? हो, नक्कीच पडलाय. जूर्माना तो किया नही लेकीन झुठा छोडना कम हुआ है. हे ऐकून खूप बरं वाटलं. लग्नात जे अन्न वाया जातं ते बघून अतिशय वाईट वाटतं. माझ्या मुलाच्या ह्यावर बराच विचार केला पण काही मार्ग सापडला नाही. आपण ह्याबाबतीत काहीच केलं नाही ह्याचं दुःख आजही वाटतं.