जपानला याआधी अगणित वेळा महाशक्तिशाली भूकंपाचे तडाखे बसलेले आहेत.अगदी अलीकडचा म्हणजे १९९४(? ) सालचा कोबे या बंदराच्या आसपास केंद्रबिंदू असलेला भूकंप प्रचंड विद्ध्वंसकारी ठरला. कोबे हे जपानचे एक प्रमुख शहर. येथे आधुनिक बंदरामुळे मोठी औद्योगिक उलाढाल चालत असे.नागरी आणि औद्योगिक क्षेत्रातच भूकंपाचे संकट ओढवल्यामुळे मोठीच जीवित आणि वित्तहानी झाली. अर्थात त्यावेळी  त्सुनामी लाटा न उद्भवल्यामुळे मृतांचा आकडा आताच्या आपत्तीपेक्षा कमी होता असेल पण आर्थिक नुकसान अधिक झाले असावे. त्याचे परात्पर आणि अन्योन्य (कॅस्केडिंग) परिणाम इतके दूरगामी होते की  दक्षिण आशियात प्रामुख्याने कार्यरत असणारी एक ब्रिटिश बँकही  नंतर त्यामुळे त्या कोसळली. सांगायचा मुद्दा एव्हढाच की त्यानंतर अवघ्या पंधरा वर्षांतच जपानने पुन्हा फीनिक्सभरारी घेऊन आपले पूर्वीचे वैभव परत मिळविले. असे पुन:पुन: राखेतून उभे राहाणे जपानच्या अंगवळणी पडले आहे. निसर्गप्रकोपांची तमा न करता त्यावर मात करण्याची उमेद बाळगून असणाऱ्या जपानी जिद्दीला सलाम.