नवीन मराठी गाणी लोकप्रिय करायची आहेत?  मग  त्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका  आकाशवाणीच्या  केंद्रांवरून ऐकायला मिळाल्या पाहिजेत. मूळ  गायकांव्यतिरिक्त इतर गायकांनी ती गाणी  जाहीर संगीत कार्यक्रमांतून गाऊन दाखवली पाहिजेत. असे कार्यक्रम गावोगावी आणि खेडोपाडी व्हायला हवेत. शक्य असेल तर त्या गाण्यांवर नृत्ये बसवायला पाहिजेत. तरच ती गाणी आवडती होतील आणि लोक त्यांच्या शिड्या घेतील. हिंदी गाणी  लोकांना आवडतात, ती या कारणांमुळेच.

मात्र एक तारतम्य बाळगायला हवे. ती गाणी चौकाचौकांत बोंबलणाऱ्या कर्ण्यांवर वाजायला नकोत.  अशी वाजली की त्यांतला गोंगाट ऐकून ऐकून त्यांचा तिटकारा वाटायला लागतो.