काय समानता आहे पहा. या दोन्ही राष्ट्रांनी १९४० च्या आसपास त्याकाळच्या इंग्लंड , अमेरिका व रशिया अशा बलाढ्य देशांना आव्हान देण्याचे धाडस केले. निरनिराळ्या कारणांनी दोन्ही देश पराभूत व बेचिराख झाले. तरीही पुन्हा राखेतून वर उभे राहिले. जगात मानाने वावरू लागले. या दोन्ही देशांनी केलेल्या या धाडसाचा आपल्या देशाला फायदा असा झाला की भारतीय सैन्य आधुनिक युद्धतंत्रात प्रवीण झाले व युद्ध जिंकूनही भारतातील स्वातंत्र्यलढे चिरडून टाकण्याचे सामर्थ्यच ब्रिटनमध्ये उरले नाही. लागोपाठच्या दोन महायुद्धांमध्ये ब्रिटनची एवढी मनुष्यहानी झाली की भारताला स्वातंत्र्य देणे त्यांना भागच पडले. या दोन्ही राष्ट्रातील नागरिकांची वैशिष्ट्ये नजरेला आणून दिल्याबद्दल कुशाग्र यांना धन्यवाद! प्रश्न आपण कांही शिकणार का असाच आहे. - शशिकान्तराव