मी पुष्कराज यांच्याशी सहमत आहे. मराठी बोलून कामे होत नसतील तर तो दोष आपलाच आहे. बेफिकीरसाहेब जरा बाहेर मराठी बोलून बघा अशी विनंती करीन. महाराष्ट्रात अजूनतरी मला मराठी बोलून कामे न होण्याचा अनुभव नाही. तुम्ही परदेशातली उदाहरणे देता. पण जरा भारताच्या दक्षिण भागात जाऊन बघितले का? तिथे ते स्वतःच्या भाषेशिवाय काहीच बोलत नाहीत. आम्हाला हिंदी येत नाही असे सरळ सांगतात. दुसऱ्या कोणत्याही भाषेत बोलत नाहीत. त्यांना जरा जाऊन विचारा की समजा ३०० वर्षांनंतर तुमची भाषा बोलणारी एकही व्यक्ती जगाच्या पाठीवर राहिली नाही तर तुमचे काय बिघडणार आहे? बेफिकीरसाहेब, मराठी ही आपली आई आहे. संस्कृत ही आपली आजी आहे. आपल्याला गोऱ्या मडमेसोबत आयुष्य काढायचे आहे म्हणून आपण आपल्या आई आणि आजीचे अस्तित्व मिटवून टाकले पाहिजे का? तुमच्या नसानसात तर त्यांचेच रक्त वहाणार. तुमची नाळ त्यांच्याशीच  जोडली जाणार. "माझा मराठाची बोलू कवतुके, अमृतातेही पैजा जिंके. असे म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज काय वेडे होते?