कावळे चिमण्या कोठे कधी हरवून जातात कधी बघितले आहे का..?तशीच ही माणसे कोठे हरवून जातात कधी दिसले आहे का..?कशी जगतात नि कधी मरून जातात...? ... हवेत कांही क्षण सप्तरंग लेऊन तरंगून हवेतच फुटणाऱ्या फुग्यांप्रमाणे आपलं आयुष्य... याला जीवन म्हणायचं!