एका जाळ्यात होत्या
कविता अनेक सुरेख
होती आस परंतु
आपुलीही असावी त्यात

वाटत होती भीती
कोणी वाचेल की नाही
नव्हती फार वेगळी
साधीच होती एक

एके दिनी धाडस करुनी
टाकले मी मनोगत
प्रतिसाद पाहता
झाले सफल मनोगत

राजेंद्र देवी