अन्यथा 'शठं प्रती शाठ्यम्' हे तत्त्व अंगिकारावे लागते हा व्यवहार आहे. व्यसनाधीन राहून केलेले कृत्य क्षम्य मानायचे, तर व्यसनाधीन नसलेला माणूस शोधून सापडेल कां? कोणत्या दोषावर पांघरुण घालायचे, याचे  तारतम्य ठेवावेच लागते. गुन्हा केलेल्या मुलाचा कान न्यायालयातच चावणारी आई, मूर्ख खचितच म्हणता येत नाही.