मराठी असली काय आणि नसली काय, एकुण कोणाला काय फरक पडतो? -- खरयं
समजा एक क्ष माणुस आहे, त्याला २-३ वर्षांचा मुलगा आहे. क्ष ला य भेटतो, आणि म्हणतो, तुझ मुलगा मला दे, मी त्याचा व्यवस्थित सांभाळ करीन.
क्ष ला काहीही कमी नसले, तरी य त्याच्यापेक्षा बराच श्रीमंत आहे, चांगलाही आहे. त्यामुळे य कडे गेल्यावर भले होण्याचीच शक्यताच अधिक आहे. मुलाला य कडे सोपवून क्ष आनंदी होईल का? तो फार फार तर या बाबतीत सुख मानू शकतो, पण खरोखर सुखी होऊ शकत नाही. मुलाला स्वतः कडे ठेऊनच वाढवणे त्याला अधिक आनंददायी असेल.
आता याचा आणि भाषेचा संबंध काय?
आपला मुलावर प्रेम असणे हे आपल्या वंशवृद्धीसाठी आवश्यक असते, म्हणूनच आपल्या गुणसूत्रात कोरलेले असते. त्याच प्रमाणे, धर्म, भाषा, देश, मानवता या अस्मिताही आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक ठरतात, आणि जीन्स मध्ये अगदी कोरलेल्य नसल्या तरी लिहिलेल्या असतात.
त्यामुळे ३०० वर्षां नंतर मराठी भाषा नसेल तर काय फरक पडतो, हे जरी तर्कास बरोबर वाटले तरी भाषा टिकवण्याची ऊर्मी स्वाभाविकच असते. ज्यांना ती नसते, त्यांनी खुशाल वरील उद्गार काढावेत, ज्यांना असते, त्यांना भाषा सांभाळू दे.