अहिंसा ही एक पुस्तकी बडबड.  अहिंसावाल्यांनी  जगात कोठे अहिंसा आहे ते दाखवावे.  पुस्तकी बडबड करणे फारच सोपे. ज्याचे जळते त्याला कळते. यातूनच पुढे पोलिसांवर, लष्करावर खटले भरणारी माणसे तयार होतात. त्यावेळेला हाच मुद्दा मांडला जातो. अहिंसावाद्यावर जर कोणी शस्त्र घेऊन मारायला आला तर ते काय करणार ?  बलात्कार करणारा एका स्त्रीचे सारे आयुष्य उद्ध्वस्त करतो व थोड्या शिक्षेवर सुटतो. (अरुणा प्रकरण) .  फाशीची शिक्षा असावयास हवीच. आणि तसेच म्हटले तर साऱ्याच शिक्षांच्या बाबतीत म्हणता येईल.  "मला पिस्तूल दिले तर मी या व्यक्तीला गोळी घालीन" असे एक वक्तव्य  आठवत असेलच.  त्यामागे काय विचार होता. तेव्हा अहिंसा का आठवली नाही. आईचा विचार केला तर मुलगा या रस्त्याला जाई पर्यंत तिचे लक्ष नव्हते का.