नमस्कार बेफिकीरसाहेब,
नुसते ज्ञानेश्वर महाराजच नाहीत तर समर्थ रामदासांनीही शिवाजी महाराजांना "मराठा तितुका मेळवावा,महाराष्ट्र धर्म वाढवावा. " हा सल्ला दिला होता. आमच्या सर्वांचे म्हणणे एवढेच आहे की इतरांप्रमाणे महाराष्ट्रीयन माणसाने आपल्या भाषेचा म्हणजेच मराठी भाषेचा अभिमान धरावा आणि शक्य तिथे तिचा वापरही करावा. मी नागपुरातच रहाते. ही पूर्वी मध्य प्रदेशची राजधानी असल्यामुळे इथे हिंदीचा प्रभाव जास्त आहे. पण समोरचा माणूस जर मराठी असेल तर आपण मराठी बोलायला काही हरकत नसावी. उलट कधी कधी तर मी गंमत करते. समोरचा म्हणाला की मला मराठी येत नाही किंवा समजत नाही तर मी त्याला हसत हसत म्हणते की अरे ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. इथे सगळ्यांना मराठी बोलता आलेच पाहिजे. निदान समजले तरी पाहिजेच. वादही होत नाही आणि समोरच्याला योग्य तो संदेशही जातो.