रानडे रोड गोखले रोड नाक्यावरची. आयडीअल बुक डेपोचे मालक राहातात ती. त्यांचे आडनाव विसरलो. आता ती मोडून तिथे टॉवर होतो आहे. सत्तरच्या दशकातील एक सत्य घटना. एकदा तिथे भानामतीचे प्रकार घडू लागले. म्हणजे एका मजलावरील काही घरातून चमचे, वाट्या, वह्यापुस्तके वगैरे रस्त्यावर येऊन पडत.
पोलीस तक्रार पण झाली. दोनतीन वर्षे सातत्याने अधूनमधून हे प्रकार घडत असत. बाबा मांत्रिक झाले पण काहीच परिणाम झाला नाही.
नंतर कोणीतरी सत्य उघडकीला आणले. एका घरातील एक छोटी मुलगी कुणाच्या नकळत हे उपद्व्याप करीत होती. अगदी आजूबाजूच्या घरातूनदेखील वस्तू खाली टाकत असे. नंतर तिच्या सूज्ञ आईबाबांनी तिला
मानसोपचार तज्ञाकरवी उपाय केले आणि अखेर हे प्रकार थांबले.