लिहीण्याची शैली खरंच मजेशीर आहे.
कॉलनीतल्या डॉ. मालती कानविंदे (गायनॉकॉलॉजिस्ट) यांच्या दवाखान्याच्या पायरीवर तास न् तास बसू लागली.
खरंतर तीला २ क्रमांकाच्या बिल्डींग मध्येच जिन्याखाली आपले बाळंतपण व्हावे असे वाटत होते. (डॉ. मालती बाई कानविंदे त्याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहात होत्या) पण त्या इमारतीत पाटील इन्स्पेक्टरच्या घरी एक आडदांड आल्सेशियन होता. तो वाईट नजरेने तिच्याकडे पाहायचा. म्हणून तिघांनी तिला ४ क्रमांकच्या इमारतीतील जिन्या खालील जागाच कशी योग्य आहे हे पटवून दिले होते.
'ए, मुलांनो बाजूला व्हा. चावेल हं ती कुत्री.' मी शर्वरीचे लक्ष वेधून घ्यायला म्हणालो.
स्टाईलमध्ये टेकून उभं राहील्यामुळे, शर्टाला डाव्या वाजूला, इमारतीच्या कोलॅप्सीबल डोअरचे काळेकुट्ट ग्रीस लागले.
ही वाक्ये विशेष आवडली.