संवत्सर म्हणजे वर्ष, ३६० ते ३६६ दिवसांचा काळ किंवा विशिष्ट नावाचा शालिवाहन शक.
शक, संवत्(दोन्ही संस्कृत),  साल(फारशी शब्द), सन(मराठी) आणि  एरा(इंग्रजी) म्हणजे वर्षारंभापासून वर्षान्‍तापर्यंतचा काळ. यांतील प्रत्येकाला अनुक्रमांक असतो. 
नवीन क्रमांकाच्या शालिवाहन शकाचा/विशिष्ट नावाच्या हिंदू संवत्सराचा  प्रारंभ चैत्र प्रतिपदेला होतो, सरकारी शक २१/२२ मार्चला सुरू होतो, हिजरी सन मोहरम महिन्याच्या बीजेला(ईदला) सुरू होतो, महावीर जैन संवत् व विक्रम संवत् कार्तिक शुद्ध प्रतिपदेला  तर ख्रिश्चन एरा/इसवी सन जानेवारीच्या पहिल्या तारखेला. पारशी साल(एजदीअर्द) फरवर्दी महिन्याच्या कृष्ण तृतीयेपासून आणि फसली आजूर महिन्याच्या कृष्ण तृतीयेला सुरू होते.  भारतातील तमीळ सन आणि अन्य सन वेगवेगळ्या दिवशी सुरू होतात. जगात याशिवाय इतर अनेक कालगणनापद्धती आहेत.