भारतीय संघ जिंकला याचा आनंद अर्थातच आहेच कारण २८ वर्षांनी भारताला विश्वचषक मिळाला. पण खरं सांगू? संगकाराचा चेहेरा बघून मला खूप वाईट वाटलं. त्यांनी बिचाऱ्यांनी केवढी मेहेनत केली आणि हरले. इकडे भारतीय संघाचा जल्लोष सुरू होता आणि तिकडे संगकारा हसरा चेहेरा करून बघत होता. तरीही त्याच्या चेहेऱ्यावरचा विषाद लपत नव्हता. काय भावना असतील त्याच्या त्या वेळी? जिंकणाऱ्याचे कौतुक सगळेच करतात पण हरणाऱ्याच्या भावनांचे काय? बिचारा रडूही शकला नसेल. शिवाय परत गेल्यावर देशबांधवांकडून कसे स्वागत झाले असेल? या विचारांनी मीच खूप अस्वस्थ झाले. असो! आपल्या टीमचे अभिनंदन करायलाच हवे. पाकिस्तानशी जिंकलो तेव्हा मात्र कोणाचेच वाईट वाटले नाही. उलट त्यांच्याशी जिंकणे हा आपला अधिकारच होता.