१. एक खूणगाठ मात्र मनाशी पक्की केलीय, ओशोंनी केलेली चूक अजिबात करायची नाही, गुरू तुम्हाला साक्षात्काराप्रत नेईल असा चकवा कधीही निर्माण होऊ द्यायचा नाही! " मला वाटत ही चुक नाही, कारण गुरुच साक्षात्काराप्रत नेतो. आपणाला झालेली स्व: ची जाणीव ही ओशोंच्यामुळे आहे. फक्त गुरूची प्रत्यक्ष उपस्थिती नव्हती.
"मी अनुभवत असलेली स्व: ची जाणीव म्हणजे... मी अस्थित्वात आसल्याची जाणीव... जी सदैव आहे... जी अनुभवन्यासाठी कोणत्याही शारीरिक अवयवाची गरज भासत नाही.... "
मला वाटत ही माझी सुरुवात असावी. गेली सुमारे दहा वर्षे ओशो वाचतो/एकतो आहे. पण कोणाच्याही मार्गदर्शनाचा योग आला नाही. आपले लिखण वाचलं. लिहीण्यातली निर्भीडता जाणवली. मला वाटत ध्यान हा सजगतेच्या विकासाचा प्रवास आहे आणि स्व:ची जाणीव ही त्या प्रवासातील टप्पा आहे. आपण प्रश्नोत्तर सदरात असे लिहिले आहे कि तुम्हांला काहीही आध्यात्मिक अनुभव आलेले नाहीत. आपले लिखान असत्य वाटत नाही. पण सिद्धांना (ओशो) त्यांचे पुर्नजन्म आठवतात ते कसे? चमत्कार नाही; पण स्वत: बद्दलच्या रहस्यांबाबत काय? स्व: जाणीवेच्या पलीकडे काही आहे कि नाही?
२. "या वर ओशो काय म्हणाले असते हे कुणीही सांगू शकणार नाही कारण ज्याचं बोलणं प्रेडि़क्ट होऊ शकेल तो मास्टर काय? त्यांनी अत्यंत समर्थपणे पुन्हा सम साधली असती आणि मी म्हणालो असतो.....! "... हे लिहून सम तर आपणंच साधलेली आहे.