पण माझ्यापेक्षा लायकीहीन अशी जनता ह्याच खिंडीत येत असते हे लगेच मला समजले. कारण वेफर्स, बिस्किटस आणि गुटख्याची काही पाकिटे लगेच आसपास दिसली ---   हे अगदी पटले, मुर्खांचा बाजार आहे सगळीकडे.... भ्रष्ट आणि कामचुकार राजकारणी आणि पोलीस असल्यावर अजून काय होणार....

तरी बरं तुम्ही  पुण्या-बाहेर गेला होतात... मी मागे एकदा असाच महाराजांच्या आणि पेशव्यांचा पराक्रमाने भारावून जावून शनिवारवाड्यात गेलो होतो... पण तिथे जाऊन अतिशय निराशा पदरी पडली- अस्वच्छता,कचरा,भग्नावशेष, वारसा जपण्यात केलेली बेअदबी... वगैरे बाकी आठवणी तर सोडाच, पण प्रेमी युगलांचा चाळे करण्याचा अड्डा हे एवढे एकच विषेशण लक्षात राहिले... पुण्यात हे असले छपरी प्रकार ते देखील अशा वास्तुत होत असलेले पाहून प्रचंड संताप आला !!  पेशवे आणि महाराज परत अवतरले तर हार्ट ऍटॅक येऊन मरतील हे घाणेरडे प्रकार पाहुन... !!

तुमचे ठिकाण अजून तसे बरेच चांगले दिसते.... कॅमेरा तयार करतो माझा पण, जमल्यास जाऊ एखाद्या रविवारी !!