अशी एकच खेळाडू बाद झाल्याची बातमी पेपरात छापतीलच कशी?
आणि सचिन बाद झाल्याचे धावफलकात असणार न! असं पेपरात  मथळा म्हणून नाही छापणार!! नाही का?

आणि असं बघा , आज आपण अमिताभ बच्चनची एवढी स्तुती वगैरे करतो, त्याचे चाहते वगैरे आहोत, त्याच्या बाबतीतदेखील " त्याला आवाज चांगला नाही म्हणून आकाशवाणीने डावलले होते" हे आजपर्यंत ऐकत आलेलो आहोतच की? मग काय हा त्याचा अपमान झाला असं म्हणायचं? नाही.
आणि असं कुठाय, की भारतरत्न ज्याला/जिला दिलंय त्या व्यक्तीचा पूर्ण इतिहास हा चांगला असलाच पाहिजे. त्याच्याही जीवनात चढ-उतार असणारच की! मग सचिन अनेकदा शून्यावर बाद झाला म्हणून काही बिघडत नाही! तो खेळाचा एक भाग असणार आहे.
आजपर्यंत ज्यांना
भारतरत्न मिळालय त्यांच्याही आयुष्यात "शून्यावर बाद" असे प्रसंग असणारच आहेत. त्यांच्या बाबतीत असं कुठं छापून नाही आलं ते!
अहो , भारतरत्न नाही दिलं तरीही ते असणारच आहे, कारण तो हाडाचा "क्रिकेटर" आहे.
म्हणजे परत तेच. एकीकडं म्हणायचं, की  सगळं संपल्यावरच भारतरत्न का? कार्य करत असताना का नाही? आणि आता असं!! विसंगत नाही का?