मुळात सचिननेच 'खेळत असे पर्यंत हा पुरस्कार स्वीकारणार नाही' असे सांगितले आहे. त्यामुळे यावर चर्चा व्हायलाच नको. राहिला मुद्दा 'देव' असण्याचा. या लोकांच्या भावना आहेत. आपण ढोंगी बाबांना 'देव' मानतो. सचिनला मानायला कोणाचीच काही हरकत नसावी. तो प्रत्येकच  वेळी काही अपयशी होत नाही. शेवटी खेळात हार-जीत होणारच. पण सचिन निदान काही कर्तृत्व गाजवताना दिसतो तरी. हवेत हात फिरवून अंगारे, सोन्याचे दागिने काढणारे 'बाबा' बनतात. सचिन निदान देशासाठी तरी खेळतो. शिवाय बहुतेकांना माहित नसलेली एक  गोष्ट. एका अनाथालयातली २०० मुले सचिनने दत्तक घेतली  आहेत. हे सोपे काम नाही. तेही काहीही गाजावाजा न करता. एखाद्या मंत्र्याने एखादे अनाथ मूल दत्तक घेतले तर सगळ्या पेपरमध्ये फोटो छापून कौतुक करून घेतले जाते. सचिन नुसता क्रिकेटचाच देव नाही तर तसाच 'देव' आहे.