कांहीजण कांहीतरी धक्कादायक लिहून झोतात येतात तसा हा प्रकार वाटतो. शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेच्या संदर्भात अनेक तर्क लढविले जातात. पण विश्वासघातकी शत्रूच्या हातून सुटण्याच्या यशस्वी झालेल्या त्या प्रयत्नाने सावरकरांना प्रेरणा दिली. अयशस्वी ठरला तरी प्रयत्न केला हे तर सत्य आहे. त्याचा तपशील त्यांच्या साहसाचे महत्त्व कदापीही कमी करू शकणार नाही. एकेकाळचे आपले शत्रू , ब्रिटिश लोक आज त्यांच्या देशात , देशभक्तीचा नमुना म्हणून  धिंग्रा आणि सावरकरांचा गौरव करण्यास खळखळ करीत नाहीत आणि आपण? आपल्यालाच आपल्या लोकांचे मोठेपण कळत नाही.