आठवला. तो देण्यात लेखातील मजकुराला आव्हान देणे हा हेतू नाही. मी शिस्तप्रिय, प्रत्येकाने आवश्यक तो व्यायाम करावा, कामाच्या बाबतीत स्वावलंबी असावे, बाईक किंवा स्कूटर ऐवजी सायकल वापरावी असेच माझे मत आहे. किश्शातील फक्त विनोदाचा भाग घ्यावा.
दुसऱ्या महयुद्धाच्या वेळी बोलणी चालू असतांना हिटलरचा परराष्ट्रमंत्री हेर फॉन रिबेंट्रॉप चर्चिलना शिस्तीचे महत्त्व सांगून म्हणाले की मी वेळेवर जेवतो, मोजके खातो, मोजका व्यायाम करतो, दारू पीत नाही, धूम्रपान करीत नाही आणि मी १०० टक्के तंदुरुस्त आहे.
चर्चिल म्हणाले, मी वाटेल तेव्हा झोपतो, वाटेल तेव्हा उठतो, भरपूर दारू पितो, वाटेल तेव्हा वाटेल ते वाटेल तेवढे खातो, जुगार खेळतो, घोड्यावरून रपेट करतो, वेगळा व्यायाम मात्र करीत नाही, स्त्रीगमनही करतो. आणि मी २०० टक्के तंदुरुस्त आहे.
सुधीर कांदळकर