सचिनला भारतरत्नची गरजच नाही. लोकांनी त्याला आपल्या मनात "क्रिकेट सम्राट" या पदावर बसवलंच आहे की. इतर भारतरत्नांना
आपण विसरून जाऊ. किंबहुना मला आजपर्यंत भारतरत्न मिळालेल्यांची फारशी माहितीही नाही. पण सचिनला आपण विसरू शकत नाही
हाच त्याचा सन्मान आहे. छ. शिवाजी महाराज , ज्ञानेश्वर , इत्यादिकांना कोणी भारत रत्न दिली होती का ? (असल्यास मला माहित नाही)
पण आपण अशा लोकोत्तर पुरुषांना विसरलो का ? सचिन हा क्रिकेट मधील लोकोत्तर पुरुष आहे. पण ती त्याला निवृत्त झाल्यावर द्यावी हे
पटले. मिडीयावाले बसलेच आहेत अशा लोकांचं उणं दाखवायला.