१) तुम्ही जेव्हा माझं लेखन वाचता तेव्हा तीन गोष्टी उपस्थित असतात : मॉनिटर स्क्रीन, तुम्ही आणि तुमचं आकलन. तुम्हाला जे काही समजेल तो सर्वस्वी तुमच्या बुद्धीमत्तेचा भाग असतो.
मी अध्यात्मिक साधना (वाचन आणि ध्यान करत) होतो त्यावेळी ज्या क्षणी माझ्या ही गोष्ट आली त्या क्षणी माझी जाणिव स्वतःप्रत आली. माझं आकलन आणि मी एक झालो, ओशो दुय्यम झाले. मी ओशोंचं काय कुणाचंही लेखन वाचणं थांबवलं ( नंतर निव्वळ योगायोगानी मी श्री निसर्गदत्त महाराज आणि एकहार्ट टोल वाचले पण ते सम अनुभुतीचं प्रत्यंतर होतं) आणि मला काय म्हणायचंय ते सांगायला सुरूवात केली.
२) मला ओशों विषयी कृतज्ञता आहे पण त्यांच्या मिस्टीसीझम (गूढ अनुभव) बद्दल माझं दुमत आहे. श्री निसर्गदत्त महाराजांनी म्हटलंय:
"कोणताही अनुभव नसलेला मी एक महा-अनुभवी आहे"!
गूढ अनुभवां पेक्षा अशा लेखनाला मी मानतो कारण अनुभवातल्या फरकांमुळे सत्य जाणण्यात (किंवा आपणच सत्य आहोत) या वस्तुस्थितीत काहीही फरक पडत नाही.
स्व जाणिवे पलिकडे काहीही नाही कारण मग तुम्ही जाणणाऱ्याला जाणले असते.
३) त्यांनी अत्यंत समर्थपणे पुन्हा सम साधली असती आणि मी म्हणालो असतो.....! "... हे लिहून सम तर आपणंच साधलेली आहे.
हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्ही पण समेवर आला आहात!
धन्यवाद!
संजय