प्रत्येक लेख, कविता ह्यांच्यातल्या एका पात्राशी तरी आपले (कॅरेक्टर मॅपिंग) सूर जुळतात का हे प्रत्येकजण पाहत असतो... जिथे ते जुळतात तिथे तो माणूस त्यांचा फॅन होतो... जिथे जुळत नाहीत तिथे विश्लेशक किंवा टिकाकार. होतात.. फार कमी लोक तटस्थपणे काहिही प्रतिसाद न देता पुढील कामाला लागतात...
पण, आपले विचार लोकांना पटणाऱ्यांची संख्या जास्त आहे असे कळल्यावर तरी आनंद पसरवत राहण्यासाठी तरी पुस्तक छापावेच.. नव्या मित्र परिवाराचा शोध, माझ्यासारख्या विचार करणाऱ्यांच्या मनाचा शोध होता आणि अजूनही आहे - हे पटले...
लिहित रहा...अजुनही मराठी वाचणारे (विकत घेऊन) कमी नाहीत. मराठी वाचनाला दर्जेदार लेखनाची रास्त अपेक्षा असते, त्यामुळे तुमच्या अनेक सुधारित आवृत्या येवोत ही सदिच्छा.
-आशुतोष दीक्षित.