फारसीमधला दार हा प्रत्यय बहुधा फारसी आणि प्राकृत शब्दांना लागतो. उदा० अणीदार, अंमलदार, अर्जदार, अब्रूदार, आमदार, इनामदार, उबदार, ऐपतदार, कणीदार, कंत्राटदार, कर्जदार, कळीदार, कारखानदार, किल्लेदार, खजीनदार, खासदार, ... जमादार, जमीनदार, जामदार, जामीनदार....ठेकेदार...बलुतेदार, बुट्टीदार, बुट्टेदार...मामलेदार..हवालदार वगैरे. या सर्वांमध्ये 'रेषेदार'मध्ये आहे तसे आकारान्त स्त्रीलिंगी संस्कृत शब्दाला दार लागल्याचे कुठेच दिसत नाही.
रेषेदारच्याच जवळपासच्या अर्थाने मराठीत रेषाळ वापरतात. त्यातला 'आळ' संस्कृत आलवरून आला आहे. त्यामुळे हा आळ संस्कृत शब्दांवरदेखील घेता येतो. केसाळ, खट्याळ, खडकाळ, गवताळ, जिव्हाळ, तोंडाळ, दुधाळ, मधाळ, रवाळ, रसाळ, वाचाळ, वायाळ(संदर्भ : लिंबाचे वायाळ सरबत-गुंड्याभाऊचे दुखणे), इत्यादी इत्यादी.
मला वाटते फक्त सालीला लागून जर उभ्या रेषा असतील तर त्या आंब्याला रेषेदार आंबा म्हणावे, आणि गरातही रेषांचा गुंता असेल तर रेषाळ. (तंतोतंत एकाच अर्थाचे दोन शब्द भाषेत बहुधा नसतात, आणि नसावेतही.)
---अद्वैतुल्लाखान