कोणी बघतो ताजमहाल

आयफेल टॉवर बघतो कोणी

नातीने भिंतीवर मारलेल्या रेघोट्यात

मला तरी दिसतात अजिंठ्याची लेणी!!