इतर भाषेतील शब्द, आपल्या भाषेत वापरताना, आपण त्याच्याशी जवळच्या आपापल्या भाषेतील शब्दाचे लिंग त्याला चिकटवतो. एका हिंदी मित्राशी बोलताना मला हे विशेषकरून जाणवलं होतं. मी त्याला म्हणालो "मेरी बैग देना जरा... " त्यावर तो म्हणाला "मेरी बैग नहीं, मेरा बैग! "  मी माझी पिशवी प्रमाणे माझी ब्यागचे मेरी बैग केले, तर त्याच्या डोक्यात मेरा थैला वरून 'मेरा बैग' असे होते.

ऑपरेशन हे बऱ्याच ठिकाणी वापरण्यात येणारा शब्द आहे, तो शब्द "ते काम" या अर्थाने नपु. वापरला जातो; पण सर्जरी म्हणजे शस्त्रक्रियाच, म्हणून स्त्रीलिंगी म्हणून वापरला जातो, असे मला वाटते.

पिक्चर जेंव्हा चित्र या अर्थी असेल तेंव्हा मी नपु.  वापरतो, पण चित्रपट या अर्थी असेल तर पुल्लिंगी वापरतो... मला वाटते हा भाग काहीसा व्यक्तीसापेक्षच राहणार.

अर्थात, हे फारच विषयांतर झाले, पण 'रेषेदार'बद्दल सहमत आणि चर्चेतून बऱ्याच गोष्टी दाखवून दिल्याबद्दल दोघांनाही धन्यवाद! (सध्याच्या दूरचित्रवाणीप्रणित भाषेप्रमाणे - दोघांचेही धन्यवाद करतो  )