'नाही' ला दुसरी बाजू पण आहे :
'नाही' हा शब्द आव्हान निर्माण करतो. मला जमणार नाही म्हणजे काय? मी करून दाखवीनच!
'नाही' हा 'आपल्याला मिळालेला नकार' न समजता 'नकार देणाऱ्या व्यक्तीनी निवडलेला पर्याय' समजला तर नकाराचा अजिबात त्रास होत नाही. तीनी मला नाकारलं असं समजण्या पेक्षा तीनी तिचा आवडता पर्याय निवडला असं म्हटलं की तुम्ही निराश न होता नवा पर्याय शोधू शकता.
मनानी नकारात्मक निर्णय घेतला आणि तुम्हाला एखादी गोष्ट करायची असली आणि तुम्ही ती केली की तुमचा आत्मविश्वास कमालीचा वाढतो.
"मी न मारलेले शॉट १००% चुकतात. " हे मात्र एकदम खरंय! त्यामुळे कोणत्याही विरोधाला न जुमानता आपल्याला हवं ते शांतपणे करणं सर्वात श्रेयस!
संजय