ह्रतिक - हा ऋत्विज किंवा ऋत्विक चा अपभ्रंश असावा. ऋत्विज म्हणजे यज्ञ करणारे पुरोहित. (ते ही वेदकालीन. हल्लीच्या पुरोहितांना कुणी ऋत्विज म्हणत नाहीत.)

अनुष्का - बहुधा हा भारतीय शब्द नाही. फार्सीतून आलेला असावा. काही माहिती मिळाल्यास नक्की सांगेन.

दुसरे,

पौर्णिमा शब्दाचा संबंध पूर्ण शी आहे. पूर्ण चंद्राची रात्र म्हणून पौर्णिमा. राका म्हणजे 'रात्र', पौर्णिमा नव्हे. रात्रीचा स्वामी म्हणून तो राकेश. म्हणजे चंद्र.