मराठी भाषेमध्ये नपुंसकलिंगाचा ऱ्हास होत आहे हे विधान सध्या थोडे धार्ष्ट्याचे ठरेल, पण तशा प्रवृत्ती दिसू लागल्या आहेत. 'लेणे' हा नपुंसकलिंगी शब्द 'लेणी'असा एकवचनी स्त्रीलिंगी समजून त्याचे लेण्या असे अनेकवचन केले जाते. धाबे हा शब्द पंजाबी धाबा या यासारखा पुंलिंगी वापरून 'त्यांचे धाबे दणाणले आहेत' अशी वाक्यरचना होते. इतकेच नव्हे तर 'ऋण' हा शब्द देखील भल्याभल्यांकडून पुंलिंगी वापरला जातोय. ऊकारान्त शब्दांची अनेकवचने गायब होऊ लागली आहेत. सासू सासवा न होता सासूच राहातो(ते). लिंबूचे अनेकवचन लिंबे(लिंबवे) न होता लिंबू च राहाते.
मराठीमध्ये शब्दांचा नपुंसकलिंगी वापर कमी होत जाणे हा हिंदी- इंग्लिश चा परिणाम मानावा का?