बर्फी हा शब्द नक्कीच फार्सीतून आला आहे. बर्फपासून बर्फी. रंग पासून जसा रंगीं. रंगीं या शब्दाचा अर्थ फार्सीत सुंदर असा होतो. उदाहरणार्थ, गुले रंगीं म्हणजे सुंदर फूल.
ई हा प्रत्यय फार्सी भाषेतूनच आला आहे, असे वाटते. ई हा प्रत्यय फारसीत इंग्लिशमधल्या ए या इनडेफिनट आर्टिकल सारखाही (मराठी शब्द सुचवावेत) वापरतात. मेज़ी म्हणजे एक मेज असा होतो, असे आठवते. पेशी (न्यायालयातली), शादी हे शब्द असेच घडले आहेत.
यावर अधिक संशोधन करून मी पूर्ण ती माहिती देण्याचा पुढेमागे करीनच.
चित्तरंजन