शिवसेनेने आपली सीमा रेषा फक्त मुंबई हीच मानली होती. त्यांना उर्वरीत महाराष्ट्राशी जणू काही घेणे देणे नव्हतेच मूळी. दाक्षिणात्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे हे अपयश नेहमीच जाणवत राहील.
काँगेसला ही त्यांच्या चलतीच्या काळात एक बाह्य दबाब गट हवा होता तो बाळासाहेबांनी प्रत्येक संधीचे सोने करत वाढवत पक्षाच्या रुपाने दिला. पण बाळासाहेबांना जमले ते त्यांच्या मुलाला -पुतण्याला जमेलच अशी काही शास्वतीही नव्हती.
मराठी भाषेसाठी शिवसेनेने काहीही केले नाही ही शोकांतीका इतिहास जपून ठेवेल. शिवसैनिकानी आणि शाखाप्रमुखांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातच टाकण्याचा अट्टाहास ठेवला.
शिवसेना एक वावटळ म्हणून जन्माला आली आणि एक फुंकर म्हणून नष्ट होईल हे नक्की.
माझे मत कोणाला आवडणार नाही, पण राष्ट्रवादी कडे आबा पाटिल नावाचे रसायन आहे त्यांच्या कडून काही अपेक्षा ठेवता येतील.
अर्थात प्रत्येक दशकात बाळासाहेब, आबा पाटिल सारखे लोकं झाली पाहिजेत. घराणेशाही च्या विरोधात एक नवी घराणेशाही जन्माला येवु नये.
बाकी इतरांनी सांगीतल्या प्रमाणे, पहा आणि गप्प बसा.