सचिनला सर ही उपाधी देवू केली होती. ती त्याने विनम्रपणे नाकारली.


राहता राहिला प्रश्न, ''भारतरत्न'' या सर्वोच्च नागरी पुरस्काराचा.
१- हा पुरस्कार क्रीडा क्षेत्रा साठी उपलब्ध नाही.
२- सचिन हा क्रिकेटर आहे, सबब चांगलं क्रिकेट खेळणं हे अपेक्षितच आहे. जर उत्तम फिटनेस व चांगल्या फॉर्म मध्ये खेळाडू असेल तर आपोआपच त्याला मानधन, वेगवेगळी बक्षिसं, ( मॅन ऑफ द मॅच/सिरीज ऍवॉर्डस, विस्डेन, सिएट क्रिकेटर ऑफ द यिअर आदि. ) मिळतच राहतात. त्यामुळे वेगळा पुरस्कार कशाला. ज्या गोष्टीसाठी खेळाडूस मानधन दिले जातेय, त्यासाठी ''भारतरत्न''?
शिवाय हे मानधन सुद्धा घसघशीत असतं.
३- समजा एखाद्या पोलीस निरीक्षकाने एखादी केस लवकर सोडवली, तर त्याला पुरस्कार देण्यात काय पॉइंट आहे. त्याच कामाचा तर त्याला पगार मिळतो.
याच न्यायाने, डॉक्टर, शिक्षक, पोस्टमन आदी इतर व्यावसायिकांची उदाहरणे देता येतील.


सचिन हा अतिशय गुणी खेळाडू आहे व अतिशय चांगला माणूस आहे. आम्हा भारतीयांची माणसास देवत्वपदी पाहण्याची वृत्ती आपल्याला असल्या चर्चेस उद्युक्त करते‌. सचिनने कधीही वादग्रस्त विधाने केली नाहीत, तो सदिअव वादापासून दूर राहिला, मात्र त्यावर प्रेम करणारे आपण वेगवेगळ्या वादांत त्यास नेहमी ओढत राहतो.
आणि अखेरिस, भारतरत्न पुरस्कार कुणास प्रदान व्हावा, या साठी केंद्रात प्रणाली उपलब्ध आहे. ती विचार करेलच की. :)