हृतिक हा ऋत्विजचा अपभ्रंश असू शकेल पण अनुष्का हा अनुषका किंवा अनुष्णाचा अपभ्रंश असण्याची शक्यता जरा कमीच.  आणि हे जर अपभ्रंश असतील तर असे अनुभ्रष्ट नाव लोक का ठेवतात?

आणि राका म्हणजे रात्र नाही.  राका म्हणजे पौर्णिमाच.  राकेश म्हणजे पौर्णिमेच्या रात्रीचा स्वामी, अर्थात पूर्णचंद्र.  राका म्हणजे जर रात्र असा अर्थ असता, तर राकेश म्हणजे फक्त साधा चंद्र असा अर्थ झाला असता.  चंद्राच्या नांवांमध्ये राकेश हे नाव सापडले नाही.