अनुभ्रष्ट नाव लोक का ठेवतात?
मुद्दाम "अनुभ्रष्ट (की अपभ्रष्ट) नाव ठेवू या" असे म्हणून कुणी तसे नाव ठेवत असेल असे वाटत नाही. नाव ठेवताना अर्थाचा विचार बहुसंख्यवेळा होतच असतो पण कधी कधी केवळ कानाला चांगले वाटेल असे नावही ठेवले जाते, असे दिसते. काही वेळा अनवधानाने वा अज्ञानाने 'निर्दोषत्वा'कडे दुर्लक्ष होत असावे.
पूर्वीही 'दत्तात्रेय' ऐवजी 'दत्तात्रय' उज्ज्वला ऐवजी उज्वला परशुराम ऐवजी परशराम, हृषीकेश ऐवजी अनेक निरनिराळी रूपे अशी नावे ठेवलेली पाहिलेली आहेत.