तुम्ही म्हणता तशी स्थिती आहे खरी. कारणे शोधायला गेलो तर अनेक सापडतील.

१. आमच्या (आपल्या लहानपणी) मनोरंजनाची साधने कमी होती. म्हणून  उन्हाळ्याच्या सुटीमध्ये पुस्तके वाचणे हे वेळ घालवायचे प्रमुख साधन होते. एकदा वाचनाची गोडी लागली की विषयाचे बंधन राहत नाही. मराठी माध्यमात शिक्षण झाल्याने बहुतेक सर्व वाचन मराठीतून.  त्यामुळे सामान्य ज्ञान बरेच होते.

आजकाल मनोरंजनाची साधने वाढल्याने वाचनाची आवड कमी झाली आहे. त्यातून लोकप्रभा वगैरे चटपटीत वाचण्याकडे कल जास्त.

२. आजकाल मुले इंग्रजी माध्यमातून शिकतात. भारतापेक्षा अमेरिका, युरोप इथल्या घडामोडींमध्ये रस जास्त असतो. तिथले संगीत भावते. इथल्यापैकी फार झाले तर रहमान,  पंचम म्हणजे डोक्यावरून पूर.

३. तिसरे म्हणजे आजकालची मुले (हा शब्द इतक्या वेळा वापरतोय,  मी खरेच म्हातारा झालोय) उपयुक्ततावादी आहेत. ज्याचा पुढील आयुष्यात काही उपयोग नाही ते कशाला वाचायचे आणि लक्षात ठेवायचे? उद्या शिकून अमेरिकेत स्थिर व्हायचे असेल तर तिथला भूगोल, इतिहास, राजकारण, संगीत माहिती करून घ्या. इथे काय ठेवले आहे?

४. काही मैत्रिणींशी बोलताना आलेला अनुभव. जी. ए. वाचा म्हटल्यावर त्यांचे लेखन निराशा आणणारे असते, निगेटिव असते म्हणून वाचत नाही म्हणाल्या. आता बोला.